बेल्हे एसटी बस अपघात जखमी व मृतांची नावे समोर
1 min read
बेल्हे दि.१७:- पुणे – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील गुंजाळवाडी जवळ रविवार दि.१७ रोजी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात बस चालक व एक प्रवासी यांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण जखमी झाले आहेत. चालक एम.आय. सलीम (रा.चांदूरबाजार अमरावती)
व प्रवाशी प्रशांत साईनाथ होनशेटे (वय अंदाजे ३०) मू.पोस्ट बेलारा, तालुका -उमरी, जिल्हा नांदेड.या दोघांचा मृत्यू झाला आहे.भिवंडी डेपोची MH14BT4023 बस शेवगाव -कल्याण-भिवंडी मार्गावरील एसटी बस कल्याणच्या दिशेने जाताना अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन खोल खड्यात कोसळली.
अपघात इतका भीषण होता की बस पलटी होऊन तिची चाके वर झाली. रविवारी सुट्टी असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती.अचानक झालेल्या या अपघातामुळे बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले.
अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक केबिनमध्ये अडकला होता. परिस्थिती गंभीर असल्याने घटनास्थळी जेसीबी आणि क्रेन मागवण्यात आली.जखमी चालकासह इतर प्रवाशांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बसचा क्रमांक महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.झाली होती.या महामार्गावर ठेकेदाराच्या गलथानपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात जात असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थानी दिली.रस्त्याच्या साईट पट्ट्या व्यवस्थित भरल्या नाहीत,वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, स्पीड लिमिट बोर्डस लावलेले नसल्याचे दिसून येते.
तसेच वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज आहे परंतु ठेकेदाराने दुर्लक्ष केले असे सामाजिक कार्यकर्ते रामा गुंजाळ यांनी सांगितले. रस्त्याचे सर्व व्यवस्थित काम करण्याची मागणी मयुर गुंजाळ, सचिन गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, किसन बोरचटे, सरपंच नयना गुंजाळ यांनी केली आहे.
बस अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी नावे:-
कोंडीभाऊ वाकचौरे (७०, रा. बेल्हे), कमल वाकचौरे (६७, रा. बेल्हे), अरुण गुंजाळ (५१, रा. बेल्हे), दिपाली डोंगरे (३३, रा. डोंगरवाडी), शारदा मेंगडे (५९, रा. आणे), अश्विनी बहिरट (४८, रा. आणे), उल्हास तांबे (७०, रा. ओतूर), अलका गायकवाड (५८, रा. संगमनेर),
यमुना पावसे (६०, रा. हिवरगाव पावसा, संगमनेर), दिव्या पवार (२१, रा. मानवडी, सिन्नर), सिद्धेश काळे (१०, रा. पाथर्डी), आशा काळे (३५, रा. पाथर्डी), नितीन काळे (३८, रा. पाथर्डी), मगन पाटोळे (४८, रा. बुलढाणा), शोभा पाटोळे (३०, रा. बुलढाणा),
शंकर शेजाळ (५०, रा. देवडे, पंढरपूर), वैशाली शेजाळ (२३, रा. देवडे, पंढरपूर), सुंदर येलमर (४०), मनिषा बोऱ्हाडे (वय ४०), प्रतिभा मंडले (२६) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.
