गुरुकुल चा समर्थ शेळके बारावी सीबीएसई बोर्डामध्ये जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून प्रथम

1 min read

बेल्हे दि.१७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे-बांगरवाडी या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता बारावी CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने उत्कृष्ट यश संपादन केले.या निकालामध्ये समर्थ विवेक शेळके याने ९०.६० टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत जुन्नर व आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.तसेच विज्ञान शाखेत श्वेता बाबाजी बांगर हिने ७८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रिहान जमीर पटेल याने ७७.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, सार्थक जनार्धन घाडगे याने ६९.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, श्वेता संदीप मटाले हिने ६९.४० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, स्नेहा महेंद्र रोकडे हिने ६८.८० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक तर तन्मय सुरेश गलांडे याने ६७.४० टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला.या सर्व विद्यार्थ्यांना डॉ.शिरीष गवळी,प्रा.संकेत वामन, प्रा. आरती लंके,डॉ.रुस्तुम दराडे,प्रा.स्वाती पवार,प्रा.गणेश बोरचटे,प्रीती काकडे,प्रा.रामचंद्र मते,प्रा.रोहित जाधव, प्रा. सुकन्या हिंगे,प्रा.पूजा भुजबळ,प्रा.सोमनाथ कदम,प्रा.अनिल कदम व प्रा.प्रियंका गाडगे यांनी अध्यापन केले.तसेच क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे व पर्यवेक्षक सखाराम मातेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष वसंतरा शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,संचालिका सारिका शेळके, संचालिका तथा मा.जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, समर्थ जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!