श्री बेल्हेश्वर विद्यामंदिराच्या निवेदिता मुळूक हीची पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात निवड
1 min read
बेल्हे दि.१६:-रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे (ता.जुन्नर) ची विद्यार्थीनी निवेदिता नितीन मुळूक हीची माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेतून इयत्ता अकरावीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.
निवेदिताने या पूर्वीही उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, रयत प्रज्ञाशोध परीक्षा, रयत ऑलिंपियाड परीक्षा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा या परीक्षांतही उत्तम यश मिळवले आहे.
निवेदिताच्या या शाळेबद्दल शाळा समिती,शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती तसेच सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
