राजुरीच्या हडवळे कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी
1 min read
राजुरी दि.१६:- राजूरी गावचे बबन वामन हडवळे व त्यांची भावंड डॉ. दीपक वामन हाडवळे सौभाग्यवती राधा संभाजी सोनवणे व सौभाग्यवती गुलाब उत्तम कोरडे यांनी आपल्या आई-वडिल कै. दगडुबाई व पार्वतीबाई वामन हाडवळे व कै. वामन जानकु हाडवळे यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ
सायंकाळी जोग महाराज वारकरी संस्था आळंदी देवाची येथे ५०० ते ५५० विद्यार्थ्यांना अन्नदान केले. तसेच दि.14 मे रोजी बबन वामन हडवळे यांनी बांगरवाडी येथील मोरांना 500 किलो गहू दिले. त्याचबरोबर संकल्प अन्नपूर्णा केंद्र, राजुरी येथील गरीब, गरजू व वयोवृध्द निराधार, अनाथ मुलांना
मोठा आधार असून कै.माता दगडूबाई व कै. माता पार्वती बाई व पिता कै. वामन जानकु हाडवळे यांच्या स्मरणार्थ बबन वामन हाडवळे व डॉ. दिपक वामन हाडवळे यांनी संकल्प अन्नपूर्णा केंद्रास ११११ रुपये अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
