राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम व्यापक स्वरूपात राबवणार

1 min read

मुंबई दि.१५:- भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) करण्यात येणार आहे.बीएलओ ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात घरोघरी जाऊन भेटी देतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!