जनगणनेचे सोशल मीडियावर बनावट आणि अनधिकृत अर्ज व्हायरल 

1 min read

पुणे दि.९:- जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे.FactCheck  DGIPRFactCheck जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. १. स्व नोंदणी – नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला ‘SE ID’ त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.२. थेट माहिती देणे – दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. आवाहन प्रशासनात तर्फे करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!