जुन्नर तालुक्यात तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्य
1 min read
तळेरान दि.६:- जुन्नर तालुक्यातील तळेरान येथे हृदयद्रावक घटना घडली असून वसईवाडीच्या पाझर तलावात पाय घसरून पडल्याने दोन जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
गणेश रामदास साबळे आणि त्याची जुळी बहीण श्रावणी रामदास साबळे (दोघे वय ११) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. या दोघांनी आपले प्राण गमावले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. रामदास साबळे यांची मोठी मुलगी अक्षदा साबळे घराशेजारील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती.
तिच्यापाठोपाठ तिची ही दोन्ही लहान जुळी भावंडे खेळत खेळत तिथे गेली असता, त्यांचा पाय घसरून ते खोल पाण्यात पडले. यावेळी अक्षदाने त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मात्र जवळपास कोणीही नसल्याने तिला वेळीच मदत मिळू शकली नाही आपल्या डोळ्यादेखत दोन्ही मुले पाण्यात बुडाली.
