मातोश्री सायन्स कॉलेजचा हर्ष ठुबे टाकळी ढोकेश्वर केंद्रात पाचवा 

1 min read

कर्जुले हर्या दि.५:- येथील मातोश्री शैक्षणिक संकुलातील मातोश्री सायन्स कॉलेज चा विज्ञान शाखेचा निकाल 100 % लागला.फेब्रु/ मार्च एच.एस.सी. २०२६ परीक्षेसाठी एकूण ११६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामधून हर्ष कैलास ठुबे या विद्यार्थ्याने टाकळी ढोकेश्वर केंद्रात पाचवा क्रमांक पटकावत संस्थेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला. प्रथम पाच क्रमांक खालीलप्रमाणे..१) हर्ष कैलास ठुबे – ७९.८३ % २) सार्थक बाळशीराम ढोले – ७८.३३ % ३) अनुजा ज्ञानदेव वापरे – ७७.६७ % ४) अनुष्का गोकुळ भागवत – ७६.५० % ५) आयुष राहुल गायके – ७६.१७ % तसेच या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कॉलेजमधील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना प्राचार्य राहुल सासवडे, गणेश हांडे, राजेंद्र साठे, राहुल दुस, सुनील व्यवहारे, प्रतीक खेडकर, सुवर्णा उंडे यांचे मार्गदर्शन लाभले.मातोश्री संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.केवळ परीक्षेत नव्हे तर क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान प्रदर्शन, मनोरंजन क्षेत्रातील विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासोबतच नेतृत्वगुण विकसित होतात. या उल्लेखनीय निकालाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मिराताई आहेर, सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, संचालिका डॉ. श्वेतांबरी आहेर, संचालिका शितल आहेर यांनी अभिनंदन केले असून संकुलाच्या सातत्यपूर्ण यशाची ही साखळी भविष्यातही असेच सुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!