बेल्ह्यात हात चलाखी करून चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सोन्याच्या अंगठ्या पळवल्या
1 min read
बेल्हे दि.२९:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे मंगळवार दि.२९ रोजी एका ज्येष्ठ नागरिकासोबत बोलबच्चन व हात चलाखी करून त्यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्या.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेल्हे येथे दिनकर रामभाऊ फाकटकर (वय ८६ राहणार बेल्हे) हे टेलर व्यवसाय करता.
सकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानात गेले असता ९ वाजण्याच्या सुमारास दुकान जवळ अनोळखी इसम आला. म्हणाला की, “तुम्हाला गाईचे तुप घ्यायचे का? “तुप हे उत्तम प्रतिचे आहे फाकटकर यांनी जवळच असणाऱ्या आपल्या घरातून सुनेला बोलावले व तूप विकत घेतले. सुन घरात निघून गेली.
त्यानंतर चोराने हात चलाखी करत त्यांच्या हाताला तूप लावले व खात्रीशीर तूप असल्याचे सांगितले. फकटकर यांच्या बोटात असणाऱ्या अंगठ्या पाहून म्हणाला तुमच्या अंगठ्या मला खूप आवडल्या आहेत. मला देखील अशा अंगठ्या बनवायच्या आहेत.माझा मित्र बाहेर उभा आहे.मला तुमच्या अंगठया काढून दया.
मी त्याला दाखवून तुमच्या अंगठ्या पुन्हा आणुन देतो. तो अंगठ्या घेवुन निघुन गेला. तो इसम जास्त वेळ झाला तरी पुन्हा आला नाही. फाकटकर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने घडलेला प्रकार आपल्या घरातील मंडळींना सांगितला व आजूबाजूला त्या व्यक्तीचा शोध करून सुरू केला.
परंतु सदर व्यक्ती कुठेही आढळला नाही. सदर घटनेची फिर्याद दिनकर फाकटकर यांनी आळेफाटा पोलिसात दिली आहे. सदर व्यक्ती गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस सदर व्यक्तीचा तपास करत आहेत.
