बेल्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाली हायटेक; २० लाखांच्या एआय-आयओटी रोबोटिक लॅबचे लोकार्पण

1 min read

बेल्हे दि.२८:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं.१ येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक एआय-आयओटी रोबोटिक लॅबचे लोकार्पण उत्साहात पार पडले. न्यू एज टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेली ही लॅब सिमुसॉफ्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चोरे व गणेश चोरे यांच्या कुटुंबीयांनी मातोश्री स्व. यमुनाबाई सिताराम चोरे यांच्या स्मरणार्थ तब्बल २० लाख रुपये खर्च करून उभारली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि भविष्यवेधी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या प्रसंगी एआय लॅबसह सुसज्ज बालवाचनालय लोकार्पण सोहळा आणि ग्रंथतुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, डॉ.मनिषाताई पळसकर प्रेसिडेंट प्रायमरी हेल्थ केअर, यांच्या हस्ते लॅब व वाचनालयाचे उद्घाटन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी लॅबमधील सादरीकरण करत बालचिमुकल्यांनी आपल्या कौशल्याने मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पिंगट होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रितम मुंजाळ यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, माजी शिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, जुन्नरचे गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार, गटशिक्षणा धिकारी अशोक लांडे, सिमुसॉफ्ट कंपनीचे सुनील चोरे, गणेश चोरे, अंजली साठे,डॉ. विद्या चोरे आदी मान्यवर उपस्थित होते.लॅबसाठी फर्निचर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत उपसरपंच नवनाथ शिरतार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्षा वैशाली मटाले व सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांचा यावेळी सन्मान करण्यात आला.शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या लॅबच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची भक्कम पायाभरणी होणार असल्याचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी सांगितले. यावेळी चोरे बंधूंचे वडील सीताराम चोरे यांची ग्रंथतुला करून ती सर्व पुस्तके शाळेच्या वाचनालयासाठी भेट देण्यात आली. ग्रंथतुलेच्या माध्यमातून ज्ञानदान करत चोरे कुटुंबीयांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.लोकसहभागातून सुमारे २० लाख रुपये खर्चून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेली ही पहिलीच एआय-आयओटी रोबोटिक लॅब ठरली आहे. उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून देणगीदारांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदीप पिंगट, सावकार पिंगट, कैलास औटी, कैलास आरोटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी,आप्पा मुलमुले, नाजीम बेपारी समीर गायकवाड, मंदाकिनी नायकोडी, तुषार डावखर किशोर अभंग, ईश्वर पिंगट प्रशांत औटी, स्वाती कोकणे, रेश्मा बनकर,नसरीन पठाण, प्रज्ञा शर्मा,शेखर पिंगट,सुवर्णा कदम इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षिका मिरा बेलकर तसेच हरिदास घोडे,अशोक बांगर, रोहिदास साळवे, नुरजहाँ पटेल, प्रविणा नाईकवाडी, सुषमा गाडेकर व अंजना चौरे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश चोरे यांनी मानले. चोरे परिवारा कडून सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!