राजुरीची गणेश दूध संस्था ठरतेय अग्रगण्य
1 min read
आळेफाटा दि.२२:-राजुरी (ता.जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध संस्थेचे दूध व दुग्धजन्य पदार्थाला गुणवत्ता असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत असून ही संस्था अग्रगण्य ठरत आहे. दूध, दही, लस्सी, ताक, श्रीखंड, पनीर, कुल्फी, तूप, पेढे यांसह अनेक पदार्थ ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत.
ही संस्था शुद्धतेला जपत असून कुठलीही भेसळ पदार्थांमध्ये नसते. राजुरी तसेच आळेफाटा बस स्थानक येथील विक्री केंद्रात सर्व पदार्थ उपलब्ध असतात. काही दिवसांपूर्वी आळेफाटा येथील राजुरी दूध संस्थेचे दुकानातील पदार्थांना अल्पावधीतच चांगली मागणी वाढली आहे. संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त असून
गोरगरीब विद्यार्थ्यांना टिफिन व टिफिन बॅग चे वाटप करणे. गावळ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन यांसारखे सामाजिक उपक्रमही संस्था राबवत असते.संस्था चेअरमन सुभाष पा. औटी, व्हा. चेअरमन दिलीप घंगाळे, सचिव निवृत्ती हाडवळे , सर्व संचालक मंडळ सभासद व कर्मचारी वृंद संस्थेच्या कोणत्याही कार्यासाठी सतत अग्रेसर असतात.
