‘विद्यानिकेतन’च्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा; एमबीए आणि एमसीए परीक्षा निकालात विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

1 min read

बोटा दि.१४:-संगमनेर तालुक्यातील उच्च शिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संचलित, विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयाने आपल्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षात यशाची उज्ज्वल परंपरा प्रस्थापित केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एमबीए आणि एमसीए ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025-26 हिवाळी सत्राच्या परीक्षेत महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन करून गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या निकालाबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. संतोष पवार यांनी सांगितले की, “महाविद्यालय याच वर्षी कार्यान्वित झाले असून पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संस्थेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विषयक शिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट यशस्वी होताना दिसत आहे.”

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे

व्यवस्थापन विभाग (एमबीए): या विभागातून फलकेस्वप्निल भाऊसाहेब याने ८.१९ CGPA मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. पाटील मयूर मानसराम (८.१५ CGPA) याने द्वितीय, तर कळमकर तेजस पांडुरंग, कुलट प्रताप संदीप व लामखेडे स्नेहल जयराम या विद्यार्थ्यांनी ८.१२ CGPA सह तृतीय क्रमांक संपादन केला.संगणक शास्त्र विभाग (एमसीए): एमसीए विभागात पुंडे अश्विनी रमेश हिने ८.६२ CGPA मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला. खोकराळे ईशा मच्छिंद्र (८.३८ CGPA) हिने द्वितीय, तर रासकर समृद्धी ईश्वर (८.१९ CGPA) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

मार्गदर्शकांची जोड:
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशासाठी एमबीए विभागप्रमुख प्रा. संतोष गोर्डे, परीक्षा प्रमुख प्रा. विवेक घंगाळे, प्रा. सागर बेलकर, तसेच एमसीए विभागप्रमुख प्रा. आरती काशीद, प्रा. तृप्ती गाजरे व प्रा. अंकिता जाधव आणि कार्यालयीन प्रमुख गणेश देशमुख यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदाचे मोलाचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभले.संस्थेच्या CEO डॉ. विद्युलता पाटील, सचिव रामदास पोखरकर, कॅम्पस डायरेक्टर दिपक रहाणे, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ. फटांगरे प्रशांत, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य सुनीता मॅडम व आय टी आय चे प्राचार्य प्रा. अभंग सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पहिल्याच वर्षीच्या या निकालामुळे बोटा व संगमनेर परिसरात विद्यानिकेतन महाविद्यालयाचे विशेष कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!