इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा विभाग यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१३:- इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा ग्रामीण विभाग (स्थापना: २०२३) अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट व बॅडमिंटन आदी खेळांचा तसेच पोस्टर प्रदर्शन, फार्मा मॉडेल मेकिंग, प्रश्नमजुषा, ADR रिपोर्टिंग आणि मॉनिटरिंग आदी स्पर्धा विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जयहिंद शैक्षणिक संकुल, वडगाव सहानी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल अहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल, सचिन कोतवाल, अध्यक्ष नॅशनल फार्मसी असोसिएशन वेलफर, डॉ. डी. एस. गल्हे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जयहिंद शैक्षणिक संकुल, प्रा. आर अल मनकर अकॅडेमिक डिन जयहिंद शैक्षणिक संकुल, फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा विभागाचे अध्यक्ष डॉ. डी डी गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. ए एस शहा, सचिव डॉ. एस डी घुले व इतर पदाधिकारी, डॉ. एस एल जाधव, डॉ. ए एच रामटेके,डॉ. आर ए हांडे,डॉ. एस एन कोठावदे, डॉ. ए एस ताजवे, डॉ. टि एस पाचपुते, डॉ. पी एल फलके, एस आर नागदेवे, जी जी टेमकर, तसेच सहभागी महाविद्यालयांचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतुल अहिरे, सचिन कोतवाल व डॉ. डी एस गल्हे यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं यशस्वी करिअर कस घडवता येईल याविषयी मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान प्रा. नागदेवे यांनी आपल्या मनोरंजन कौशल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. ए एस ताजवे यांनी आपल्या आकर्षक निवेदन शैलीने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व डॉ. टी एस पाचपुते यांनी सभागृहाचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!