ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

1 min read

मुंबई दि.१२:- ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर उद्या सोमवारी सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशाताईंना हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आयसीयुमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.आशा भोसले यांनी सात दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. १९४३ मध्ये कारकीर्द सुरू केलेल्या आशाताईंनी बालगीते, भावगीते, लावणी, चित्रपट संगीत आणि पॉप गाण्यांमधील अष्टपैलुत्वासाठी नावलौकिक मिळवला आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य पॉप पर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांमध्ये आवाज दिला आहे. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले या अनेक संगीत कारांच्या आवडत्या गायिका होत्या. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली.तसेच उद्या सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आशाताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १९३३ मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. ‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘ये मेरे वतन के लोगो’ (बॅकग्राउंड), ‘क्या करें’ सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवले होते. आशा भोसले यांना ‘आशा ताई’ म्हणून ओळखले जात होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!