वयोवृद्ध पुरुषाचा खून करून जबरी चोरी करणारे दोन गुन्हेगार अटक; स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस पोलीसांची कामागिरी
1 min read
मंचर दि.१०:- मंचर पोलीस स्टेशन, गु.र.नं. ८८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३११, ३(५) प्रमाणे दि. ३१/०३/२०२६ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयात (मयत) दामोदर जयराम मिंडे वय ६२ वर्षे रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव जि पुणे हे त्यांचे शेतावरील घरात झोपलेले असताना अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून
त्यांचे डोक्यात लोखंडी पहार ने मारून त्यांचा खून केला आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २९,०००/- किं.चा मुद्देमाल जबरीने चोरी केला असल्याची फिर्याद मयत दामोदर मिंडे यांची मुलगी सौ गितल सतिश गावडे वय ४० वर्षे रा. बेंडेमळा, मंचर ता. आंबेगाव जि.पुणे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सुरू केला, घटनास्थळी भेट देवून पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,
दोन इसमांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. उपलब्ध फुटेजच्या आधारे पुढील तपास करणेत आला. गुन्हयातील आरोपींनी पेंशन मोटार सायकलचा वापर करून गुन्हा केलेनंतर खोडद बेल्हे मार्गे पारनेर बाजूकडे गेले असल्याचे निष्पन्न झाले असून सुमारे ६० किमी चे अंतरात सुमारे १०० सीसीटीव्ही तपासणेत आले.
स्था.गु.शा.चे पथक पारनेर परिसरात तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हा हा कबीर उंबऱ्या काळे रा. पुणेवाडी ता. पारनेर जि. अहील्यानगर याने केला असून त्याचे जवळ पेंशन मोटार सायकल आहे. मिळालेल्या बातमीचे आधारे खात्री करून तपास पथकाने दि.०५/०४/०२०२६ रोजी सापळा लावून
पुणेवाडी परिसरातून आरोपी नामे १) कबीर उंबऱ्या काळे वय २४ वर्षे सध्या रा.पुणेवाडी,ता.पारनेर जि.अहिल्यानगर, मुळ रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा जि. अहील्यानगर व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता, त्यांनी नमुद गुन्हा केल्याचे सांगितले असून गुन्हयात वापरलेली पेंशन मोटार सायकल हस्तगत करणेत आलेली आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी अहिल्यानगर जिल्हयातील बेलवंडी, पारनेर, नगर तालुका पोस्टे ला तसेच पुणे ग्रामीण जिल्हयातील आळेफाटा पो स्टे येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे एकूण ०९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीस मा. न्यायालयासमक्ष उपस्थित केले असता,दि.११/०४/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.
आरोपी कबीर उंबऱ्या काळे याचेकडे सखोल चौकशी केली असता, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच आरोपीने सांगितलेप्रमाणे १) ओतूर पो स्टे. गु.र.नं. ७९/२०२६ बी.एन.एस. ३०९ (६),३०५,३ (५), २) घोडेगाव पो.स्टे. गु.र.नं. ४२/२०२६ बी.एन.एस. ३०९ (४), ३११ ३) मंचर पो.स्टे. गु.र.नं. ६५/२०२६ बी.एन.एस. ३०४(२),
३(५) ४) दिंडोरी पो स्टे नाशिक गु.र.नं.९२/२०२६ बी.एन. एस. ३०९ (४), असे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड उपविभाग,
यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, मंचर पो स्टे चे पो.नि. श्रीकांत कंकाळ स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, राजू मोमीण,
अतुल डेरे, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, राहूल पवार, समाधान नाईकनवरे, सुजाता कदम, भाउसाहेब पुंड, अजय देडे मंचर पो स्टे चे सपोनि सुनिल बडगुजर, पोसई सनील धनवे, पोलीस अंमलदार संजय नाडेकर, हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, सुनील काठे, अजित पवार, यांनी केली आहे.
