बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचा शेतकरी कर्ज वितरण शुभारंभ

1 min read

बेल्हे दि.१०:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील विविध कार्यकारी सोसायटीचा शेतकरी कर्ज वाटप शुभारंभ जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे व बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.७) रोजी करण्यात आला.संस्थेचे एकूण सभासद ३७६९ असून संस्थेचे दोन हंगामामध्ये एकूण कर्ज वाटप २६ कोटी रुपयांचे एकूण वाटप असून, मार्च अखेर संस्था पातळीवर ९३ % वसुली झाली आहे. तसेच संस्थेला केंद्र शासनाकडून सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी गोदाम योजना, या अंतर्गत पहिला गोदाम बांधण्याचा मान आपल्या संस्थेला मिळाला असून, या साठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५६.८७ लाख एवढे कर्ज मंजुर केले असून, यासाठी ३३. ३३% सबसिडी प्राप्त होणार आहे व त्यासाठी १% व्याजदार आकारलेला आहे. सध्या गोदाम बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे सचिव बाळासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास औटी, बन्सी डावखर, जयवंत घोडके, लहू गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ, वसंत कदम, मोहन बांगर, संजय बोरचटे, सुमित बोरचटे, कविता तांबे, संजय चंगेडिया, विठ्ठल सावंत, प्रकाश डावखर,विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, वसुली अधिकारी संदीप जाधव, विकास अधिकारी सिद्देश गुजर, बँक मॅनेजर किरण गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कर्ज वाटप शुभारंभ जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे यांच्या हस्ते गणरायाला श्रीफळ वाढवून करण्यात आला.या वेळी पुणे जिल्हा बँक वरिष्ठ अधिकारी सुभाष कवडे बोलताना म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेच्या व विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप शुभारंभ करत असताना आम्ही शेतकऱ्यांना १० एप्रिलच्या आतच कर्ज मिळावे, कर्जाचे वाटप व्हावे असा पायंडा आम्ही जुन्नर तालुक्यात पाडलेला आहे. त्याचे कारण असे की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात पैसे असतातच असे नाही, उसने पासने घेऊन, दागिने गहाण टाकून, येन केन प्रकारे तो प्रामाणिक पणे कर्ज भरत असतो व त्याला कर्ज वेळेवर उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य ठरते. तसेच संचालक मंडळ जसे कर्ज वाटपात उत्साहाने भाग घेत असते. तसाच उत्साह त्यांनी कर्ज वसुलीसाठीही दाखवावा असे आम्हाला वाटते. नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक सभासदासाठी शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू.तसेच सर्व सभासदांनी वेळेवर कर्ज भरून शासनाच्या शून्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!