आयसर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

1 min read

बेल्हे दि.४:- पारगाव तर्फे आळे येथे आयसर टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शुक्रवार दि.३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमएच १४ बीपी ११९८ वरून बेल्हे ता.जुन्नर येथील चंद्रकांत विठ्ठल नाईकवाडी (वय ४६) ही टाकली हाजी येथून बेल्हे येथे घरी जात असताना बेल्हे – जेजुरी महामार्गावर पारगाव बस स्टॅन्ड जागा जवळ कडेला थांबले असताना पाठीमागून येणारा आयशर टेम्पो एमएच १२ वायक्यू ३६१० याने जोरदार धडक दिली.खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या बाबतची फिर्याद आकाश पिंगट (वय २४) राहणार बेल्हे तालुका जुन्नर यांनी दिली असून टेम्पो चालक सोमनाथ त्रिंबक पवार (राहणार चिंचणी तालुका शिरूर,जिल्हा.पुणे) यांच्यावरती नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.सदर अपघाताचा पुढील तपास संदीप फड करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!