वर्षभरानंतर बीडचा खोक्या भोसले तुरुंगाबाहेर
1 min read
बीड दि.४:- बीड जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सतीश भोसले उर्फ खोक्या हा गेल्यावर्षी प्रकाश झोतात आला होता. बॅटने मारहाण करताना त्याचा एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर वन्यजीव शिकार, वन जमिनीवर अतिक्रमण अशी प्रकरणे उघड होत गेली. नोटांचे बंडल उडवितानाचे व्हिडीओ आले.
तो भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने राजकीय अँगलने प्रकरण आणखी तापले होते. त्याला अटक झाली. त्याचे घर पाडले गेले.एका व्यक्तीला बॅटने मारहाण या बरोबरच शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या मागील वर्षभरा पासून कारागृहात होता.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली. आता वर्षभराने तो जेल बाहेर आला. बाहेर येताच त्याने पुन्हा रील करण्यास सुरवात केली आहे.
