इराणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली; आखाती युद्धात अमेरिकेचा विजय:- डोनाल्ड ट्रम्प
1 min read
वाँशिंग्टन दि.२:- इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेला संबोधित केले. यावेळी इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले. इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाला अशी घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
आम्ही युद्ध संपवण्याच्या अगदी नजीक आहोत. आम्ही कधीही मिळवला नाही असा विजय मिळवलाय. आमची सामरिक उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली. आम्ही इराणला अण्वस्त्र सज्ज देश होण्यापासून रोखलं, त्याचा मला अभिमान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेला होर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेल साठा, गॅससाठा आहे,
असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही नाटोतूनही बाहेर पडू, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. गेल्या चार आठवड्यात, आपल्या सैन्याने रणांगणावर जलद, निर्णायक आणि जबरदस्त विजय मिळवले आहेत. आखाती युद्धात अमेरिकेने विजय मिळवला आगे.असे विजय फारच मोजक्या लोकांनी यापूर्वी कधी पाहिले असतील.
अमेरिकन लष्कराने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरू केले होते. यामध्ये दहशतवादाला राज्याश्रय देणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असणारा इराण आमचं लक्ष्य होतं. यामध्ये आम्ही विजय मिळवला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आपल्या संबोधनादरम्यान एक महत्त्वपूर्ण विधान करताना ट्रम्प म्हणाले,
आम्हाला मध्यपूर्वेतील तेल नको आहे. परंतु आम्ही आमच्या मित्रराष्ट्रांना मदत करू. ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल मिळवणाऱ्या इतर देशांना आवाहन केले की, त्यांनी या मार्गाची काळजी घ्यावी. तो आपल्या ताब्यात घ्यावा आणि त्याचे जतन करावे, असं ट्रम्प यांनी सांगितले.
मध्यपूर्वेतील आपले मित्रदेश इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि बहरीन यांचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानले. तसेच या मध्यपूर्वेतील या मित्रदेशांना आम्ही कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू देणार नाही किंवा त्यांना अपयशी ठरू देणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
