बेल्हे येथे बिबट्या जेरबंद

1 min read

बेल्हे दि.१:- विश्वासराव मळा, बेल्हे (ता.जुन्नर) येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पाच ते सहा वर्षाचा नर बिबट जेरबंद झाला आहे. मंगळवार दि.३१ रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. सदर बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे. अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे दिली.बेल्हे जवळील विजय बाळू गुंजाळ यांच्या गट नंबर १११ या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला होता. अनेक पाळी प्राण्यांवरती बिबट्याने हल्ले केले होते. हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वाढत्या बिबट्यांमुळे परिसरात विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!