पारगाव तर्फे आळे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास डुकरे व उपाध्यक्षपदी हरिचंद्र विश्वे यांची निवड

1 min read

बेल्हे दि.२८:- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) विकास सोसायटीचे अध्यक्ष नितीन चव्हाण व उपाध्यक्ष विलास चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर अध्यक्षपदी कैलास डुकरे व उपाध्यक्षपदी हरिचंद्र विश्वे यांची निवड करण्यात आली. जुन्नर तालुका सहाय्यक निबंध कार्यालयामध्ये निवडणुक अधिकारी संतोश भुजबळ यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक बाबत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. दोन्ही नावांना संचालकांच्या वतीने पाठिंबा दिल्याने दोघांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भुजबळ यांनी घोषणा केली. पारगाव गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थ या निवडी दरम्यान जुन्नर या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी शुभेच्छा देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान केला. या निवड प्रक्रियेनंतर जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी संचालक मंडळाला नारायणगाव ठिकाणी बोलवून अध्यक्ष कैलास डुकरे व उपाध्यक्ष हरिश्चंद्र विश्वॆ यांचा सन्मान केला. संजय काळे यांनी संचालक मंडळांनी चार वर्षात केलेल्या कामकाजाबाबत सर्वांचे अभिनंदन केले व तालुक्यातील सर्वात तरुण संचालक मंडळ असून एक विचाराने राहून संस्थेची भरभराट केली. त्यामुळे संचालक मंडळाला शाबासकीची थाप पाठीवर मारली. पंचायत समिती सदस्य तथा गटनेते संभाजी चव्हाण यांनीही संचालक मंडळाचे अभिनंदन करून अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान केला. या निवडी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग गाडगे, गोपालकृष्ण पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश चव्हाण, उपसरपंच पप्पू डुकरे, माजी उपसरपंच शिवाजी डुकरे, सरपंच दत्ता म्हस्के, तंटामुक्ती अध्यक्ष बाबाजी डुकरे, सचिव किरण डुकरे तसेच औरंगपूर पिंपरीकावळचे ग्रामस्थ या या निवडी दरम्यान उपस्थित होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!