जुन्नर येथे तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक; चोरीला गेलेले ५५ तांब्याचे हांडे जप्त- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

जुन्नर दि.२८:- जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२६ भा.न्या.स ३३१(४), ३०५(अ),३(५) नुसार दाखल होता. फिर्यादी नामे आनंद हेमंत सासवडे राहणार महाजन आळी जुन्नर यांचा भांड्याचा व्यवसाय आहे त्यांच्या भांड्याच्या गोडाऊन मधून दिनांक २०/३/२०२६ रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी तांब्याचे एकूण ९० हांडे चोरून नेल्याची फिर्याद जुन्नर पोलीस स्टेशन येथे दिली होती. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता सदर भांड्याच्या गोडाऊन मधून काही अज्ञात महिला हांडे चोरून नेत असताना दिसून आले. यावरून सदरचा गुन्हा हा अज्ञात महिलांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या स.फौ. दिपक साबळे व पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा १)सारिका बबन मकवाने, २)अंजली सुरज वाघमारे , ३)सुरेखा राजू वालेकर सर्व राहणार पंचलिंग वस्ती जुन्नर यांनी केल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कुरण फाटा, जुन्नर येथे सापळा लावून सदर महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या ९० हंड्या पैकी १,३७,५०० रुपये किमतीचे एकूण ५५ हांडे जप्त करण्यात आले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही कामी जुन्नर पोस्टे येथे जमा करण्यात आले आहे.सदर ची कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप गिल्लसो, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर जुन्नर पोस्टे चे पोनि किरण अवचर स. पोनि. महादेव शेलार स.फौज. दीपक साबळे पोहवा. राजू मोमिन,संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, मपोहवा. नंदा कदम, सुजाता कदम जुन्नर पोस्टे चे पोहवा सागर हिले यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!