उम्मत की खिदमत फाउंडेशन तर्फे SIR मार्गदर्शन शिबिर उत्साहात; ६०० हून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण

1 min read

जुन्नर (राजुरी) दि.२६:- उम्मत की खिदमत फाउंडेशन आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी (ता. जुन्नर) येथे आयोजित SIR 2025 मार्गदर्शन शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले. फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक गुलामनबी जोहरा युनूस शेख यांच्या मार्गदर्शना खाली पार पडलेल्या या शिबिरात सुमारे १५० कुटुंबांतील साधारण ६०० मतदारांचे यशस्वीरीत्या मॅपिंग पूर्ण करण्यात आले.सदर शिबिर जुन्नरचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी तहसीलदार कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार गवारी, राजुरीचे ग्रामतलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित बीएलओ (BLO) उपस्थित होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना मतदार यादीतील दुरुस्ती आणि नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.शिबिरात ज्या अनुपस्थित नागरिकांचे मॅपिंग अद्याप प्रलंबित आहे, अशा नागरिकांनी २००२ च्या निवडणूक मतदार यादीशी आपल्या नावाची जुळवणी करण्यासाठी ‘उम्मत’ कार्यालयाशी संपर्क साधावा तेथे नागरिकांना तांत्रिक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल असे मुख्य प्रवर्तक गुलामनबी जोहरा युनूस शेख यांनी आव्हान केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ‘उम्मत की खिदमत फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मतदारांचे मॅपिंग सुलभ व्हावे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत हा उपक्रम पोहोचावा, यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन अत्यंत प्रभावी ठरले.लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेबद्दल राजुरी ग्रामस्थांनी उम्मत की खिदमत फाउंडेशन आणि महसूल प्रशासनाचे आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!