प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली,१६ जणांचा मृत्यू

1 min read

ढाका दि.२६:-ईदच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बांगलादेशातील राजबाडी जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस थेट पद्मा नदीत कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.या भीषण अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ही बस ढाक्याच्या दिशेने परतत असताना दौलतदिया टर्मिनलवर ही दुर्घटना घडली.समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेली ही बस दौलतदिया टर्मिनलवरून एका फेरीवर चढत होती. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वेळी एक छोटी युटिलिटी फेरी पोंटूनला येऊन जोरात धडकली. या धक्क्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस क्षणार्धात अनियंत्रित होऊन खोल पद्मा नदीच्या पात्रात कोसळली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!