जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या मोबाईल ॲप सुविधेचा शुभारंभ
1 min read
जुन्नर दि.२५:- स्वातंत्र्यपूर्व काळात 1923 साली स्थापन झालेल्या 102 वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या “मोबाईल ॲप सुविधेचा” शुभारंभ सहकारी संस्था जुन्नरचे सहाय्यक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख,जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके,
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सेवानिवृत्त जॉईंट रजिस्ट्रार तानाजी कवडे यांच्या शुभहस्ते संस्थेच्या राजा शिवछत्रपती सभागृह जुन्नर येथे संपन्न झाला.आजच्या डिजिटल युगात सभासदांना मोबाईल ॲपच्या सुविधेद्वारे स्वतःच्या सर्व प्रकारच्या खात्यांची माहिती व संस्थेची सर्व माहिती ऑनलाईन स्वरूपात पाहण्याची सुविधा उपलब्ध होत आहे
अशी माहिती संस्थेचे सभापती सचिन मुळे यांनी दिली. जुन्नर तालुक्यामध्ये 200 सहकारी संस्था असून शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या मोजक्या संस्थांपैकी जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्था असून तालुक्यातील पतसंस्थांना आदर्श ठरेल असे काम ही पतसंस्था करत आहे असे गौरवोद्गार तालुका फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांनी काढले.
जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे कामकाज पारदर्शक व आदर्शवत असून संस्थेने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान सहकारी संस्था जुन्नरचे सहाय्यक निबंधक डॉ.गजेंद्र देशमुख यांनी केले. राज्यातील सहकारी संस्थांच्या तुलनेने सेवक पगारदार वर्गातील जुन्नर शिक्षक पतसंस्थेच्या नफ्याचा रेशो
सर्वाधिक असून पतसंस्थेचे कामकाज उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन राज्य सहकारी संस्था सेवानिवृत्त जॉईंट रजिस्ट्रार तानाजी कवडे यांनी केले.संस्थेच्या 102 वर्षाच्या प्रगतीचा आलेख जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी मांडला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख मंगेश मेहेर, जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,
तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे, राज्य प्रतिनिधी विकास मटाले, भरत बोचरे, जिल्हा प्रतिनिधी राम संभेराव, सुनील हाडवळे, संतोष पानसरे, तालुका पदाधिकारी वैभव सदाकाळ, अशोक बांगर, प्रभाकर दिघे, संदिप शिंदे, दिपक मुंढे, महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे, स्वप्नजा मोरे, वैशाली कु-हाडे,
केंद्रप्रमुख कमलाकांत मुंढे, दिनेश मेहेर, रवींद्र कुटे, संस्थेचे मानद सचिव जितेंद्र मोरे, खजिनदार सुभाष दाते, माजी सभापती विजय लोखंडे, अनिल कुटे, अंबादास वामन, नानाभाऊ कणसे, पुनम तांबे, दिलीप लोहकरे, सुनीता वामन, अविनाश शिंगोटे, दत्तात्रय घोडे, ज्ञानदेव गवारी,
सरचिटणीस उमेश शिंदे, सहचिटणीस दत्तात्रय हांडे व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती संतोष पाडेकर यांनी केले तर आभार संस्थेच्या उपसभापती सविता कु-हाडे यांनी मानले.
