अशोक खरातला मदत करणाऱ्या सगळ्यांची चौकशी होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.२५:- भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे. याशिवाय आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा अंतरिम अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासूनची सर्व माहिती सांगितली. खरातविरोधात आतापर्यंत पाच महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.दरम्यान या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावं जोडली जात आहे. त्यामुळे खरातला मदत करणारे अधिकारी आणि राजकीय नेत्यांची चौकशी केली जावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, खरातला मदत करणाऱ्या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. ज्यांच्या  विरोधात पुरावा मिळेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. डिलीट केलेला डेटा काढतोय. कोणी संपर्क केलाय, कोणी व्यवहार केलाय हा सगळा तपशील लवकरच मिळेल.मात्र खरातसोबत केवळ फोटो असल्याने त्यांना आरोपी करता येणार नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले. खरातबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, योगेश भालेराव नावाच्या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना दाखवले आहेत. यात ८ महिलांचे ३५ व्हिडिओंचा समावेश आहे. अशोक खरात याने जादूटोणा-तंत्रमंत्र वापरून महिलांसोबत अश्लील चाळे केले, लैंगिक अत्याचार केला. आणि ही बाब कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली. महत्त्वाचं म्हणजे, अशोक खरात देश सोडून जाण्याची शक्यता होती. यासाठी पोलिसांनी १० मार्च २०२६ रोजी लुकआऊट नोटीस जारी करीत त्याच्या परदेश दौऱ्यावर बंदी आणली. १७ मार्च रोजी एका महिलेने खरातविरोधात बलात्काराची तक्रारी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!