पोषण आहारात परसबागेतील भाज्यांचा वापर; श्रीराम विद्यालयाचा उपक्रम

1 min read

मंचर दि.२४:- श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांनी फुलवलेल्या परसबागेतील भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरला जात आहे. शालेय परिसरात भरपूर जागा, मुबलक पाणी असल्याने प्रत्येक वर्गाला ठराविक जागा व ठराविक भाजीपाल्याचा वाण वाटून देऊन सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला वाढविला आहे. नारायणगाव येथील कृषी प्रदर्शनातून गावरान बियाणे खरेदी केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून गावरान बियाणे शाळेसाठी दिले असल्याचे मुख्याध्यापक डी.पी. फापाळे यांनी सांगितले. मोठ्या झाडांचा पालापाचोळा, विद्यार्थ्यांनी घरून आणलेले शेणखत एका खड्ड्यात गोळा करून सेंद्रिय खत तयार करण्यात आले. श्रमदान, सेंद्रिय (गावरान) अन्नपदार्थ, पाण्याचे नियोजन इत्यादी विषयाचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कळत असल्याचे ग्रामस्थ संदीप दामू पोखरकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!