सह्याद्री व्हॅली इंजिनीअरिंगच्या २२ विद्यार्थ्यांची नामांकित ‘सॅमसंग’ व ‘जॉन डिअर’ समूहात निवड

1 min read

राजुरी दि.१७:- महरिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी (ता.जुन्नर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये इंजिनीअरिंगच्या एकूण २२ गुणवंत विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये सॅमसंग समूहाची ‘हार्मन इंटरनॅशनल’ (Harman International – A Samsung Company) आणि जॉन डिअर ग्रुपची ‘विर्टगन इंडिया’ (Wirtgen India – John Deere Group) या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महरिया चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सचिन चव्हाण आणि कॉलेजचे अकॅडेमिक डीन पी. बालरामडू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. या यशाबद्दल सविस्तर माहिती देताना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (TPO) मुरलीधर कुरकुटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट सॅमसंग आणि जॉन डिअर सारख्या आंतरराष्ट्रीय समूहात काम करण्याची संधी मिळणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!