जि.प. शाळा निमगाव सावा येथे भरला ‘आनंदी बाजार’;विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

1 min read

निमगाव सावा दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक निमगाव सावा (गावठाण) (ता. जुन्नर) येथे इयत्ता १ ते ४ मधील विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी बाजार’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आठवडे बाजाराच्या धर्तीवर भाजीपाला, फळे, विविध खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंची विक्री करून व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध आकर्षक स्टॉलमुळे शाळेचा परिसर जणू आठवडे बाजाराचे स्वरूप धारण करत होता. आनंदी बाजार पाहण्यासाठी आलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरेदी-विक्रीचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व उपस्थित ग्रामस्थांनी घेतला. पहिल्याच वेळी संपन्न झालेल्या या आनंदी बाजार उपक्रमाला निमगांव सावा परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात भाजी-पाला खरेदी करण्याचा व विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद घेतला. त्यामुळे संपूर्ण शाळा परिसर चैतन्यमय वातावरण झाले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक घोडे गुरुजी, दिलीप वळसे पाटील विद्यालयाच्या अध्यक्षा कविता पवार, सामाजिक कार्यकर्ते चंदा गाडगे , ग्रामपंचायत सदस्य बाबाजी गाडगे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ पटेल, सदस्या सादिका पटेल, मुमताज पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष जाकीर पटेल व इरफान पटेल शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संदिप बोऱ्हाडे, सुनिल गहिने,होमगार्ड गणेश गाडगे, बबन घोडे, जाबिर पटेल, सुनंदा भापकर पालक, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.निमगाव सावा शाळेत विद्यार्थी आनंदी बाजारात वस्तूंची विक्री करताना, तर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ खरेदीचा आनंद लुटताना पाहायला मिळाले. या बाजारात साधारण 31 हजार रुपयांची उलाढाल झाली.यांनीही या कार्यक्रमाला आपली विशेष उपस्थिती लावली व कार्यक्रमाचा आनंद घेतला.या संपूर्ण कार्यक्रमाचे आखीव रेखीव नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे, उपशिक्षिका शोभा गोंदके, बाळासाहेब राजगुरू, प्रभाकर गुंजाळ, दत्तात्रय हडवळे, संतोष वाघोले, आशा चुकाटे, पुष्पा गुंजाळ व मंगल आग्रे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब राजगुरू यांनी केले व आभार प्रभाकर गुंजाळ यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!