माजी विद्यार्थ्यांकडून मुलांना दप्तर वाटप
1 min read
तांबेवाडी दि.१३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी (ता.जुन्नर) येथे अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला.शाळेचे माजी विद्यार्थी ओंकार संतोष कुंजीर यांनी परदेशात काम करत असतानाही आपल्या गावातील शाळेप्रती असलेले प्रेम जपले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप केले.
या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली संतोष कुंजीर, उज्ज्वला कुंजीर, प्रियंका कुंजीर, जर्नादन सैद, दशरथ कुंजीर (सरपंच, तांबेवाडी), धोंडीभाऊ कुंजीर (पोलिस पाटील तांबेवाडी), सबाजी हाडवळे (चेअरमन, स्वामी समर्थ दूध डेअरी), विकास तांबे (व्हाईस चेअरमन) रविंद्र तांबे (तंटामुक्ती अध्यक्ष), भाऊसाहेब बांगर (ज्येष्ठ नागरिक),
माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद खरोखरच पाहण्यासारखा होता. अशा सामाजिक जाणीव ठेवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांच्या वतीने ओंकार संतोष कुंजीर आणि परिवार यांचे आभार मानण्यात आले.
