आळे येथील श्री खंडोबा मंदिरात चोरी करणारे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांची कारवाई
1 min read
आळेफाटा दि.१२:- भाविकांनी दानपेटीत केलेले दान चोरी करणारी टोळी जेरबंद करून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मंदिर चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे १,१९,०००/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.
आळेफाटा पो.स्टे.गु.र.नं. ५६/२०२६ मा.न्या.सं. २०२३ कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे दि. २३/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी शांताराम गोपाळा भुजबळ वय ६७ वर्षे धंदा- शेती रा. आळे चिचकाईमळा ता.जुन्नर जि.पुणे यांनी फिर्याद दिली असून, आळे गावातील खंडोबा मंदिरात
दि. २३/०२/२०२६ रोजी रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याच्या व चांदीचा मुलामा असलेले दागिने रू. २०,०००/- किचा मुद्देमाल चोरी करणेत आला आहे. फिर्यादीवरून गुन्हा नोंदविणेत आला आहे.जुन्नर, आंबेगाव तालुक्यात मागील दोन महिन्यात मंदिर चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती,
त्यामध्ये आळे गावातील श्री खंडोबा मंदिर, शिरोली बु॥ येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री. साईबाबा मंदिर, नळवणे गावातील श्री खंडोबा मंदिर, मंचर शहरालगतचे कळंबा माता मंदिर, जुन्नर धालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळील श्री सोमेश्वर मंदिर,
अशा मंदिरांमधील दानपेटी फोडून रोख रक्कम व भाविकांनी केलेले दान, तसेच मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरी गेले होते. सध्या यात्रा, उत्सवाचा कालावधी असल्याने गावोगावी देव-देवीच्या यात्रा उत्सव साजरा केला जात आहे, अशा वेळी मंदिरांमध्ये चोरी होत असल्याने भाविक व नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
त्याचप्रमाणे मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नागरीकांनी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण यांना संपर्क करून विनंती केली आहे.सदर गुन्हयांचा समांतर तपास करणेकामी मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पो.नि. अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा. यांचे अखत्यारीत एक तपास पथक तयार करून
गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांनी जुन्नर व खेड विभागातील पथकातील अधिकारी व अंमलदर यांचे समवेत सर्व गुन्हयांचे घटनास्थळांना भेट दिली. पचकाला योग्य सुचना करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्हे कार्यपद्धत,
तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करणेबाबत सांगितले, स्था.गु.शा.चे पथकाने सर्व मंदिर चोरीचे गुन्हयातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज पडताळले असता, सर्व गुन्हयांमध्ये एकाच वर्णनाचे आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखविणेत आले,
दि. ०३/०३/२०२६ रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीचे आधारे आरोपी नामे १) सुनील सुरेश आगिवले वय २० वर्षे, रा. कळस खु, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, २) भिमा भाऊसाहेब गिन्हे वय २६ वर्षे रा. नांदूर शिंगोटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, मुळ रा. कोतूळ ता. अकोले जि. अहिल्यानगर,
यांना पुणे नाशिक हायवेवरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितले आहे, त्याच प्रमाणे त्यांचे कडून गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल, कटावणी, स्कु डायव्हर, सो, रोख रक्कम, चांदीचे पादुका असा एकूण १,१९,०००/- रू. किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
गुन्हयातील आरोपींना मा. न्यायालया समक्ष उपस्थित करणेत आले असून, आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,
जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, राजु मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, समाधान नाईकनवरे, मपोहवा सुजाता कदम यांनी यांनी केली आहे.
