स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांनी फुलवली परसबाग

1 min read

बेल्हे दि.९:- (वार्ताहर:-रामदास सांगळे):- स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर)शाळेच्या आवारात विद्यार्थांनी परसबाग बनवली असून एवढा उन्हाचा तडाखा असूनही ती ताजीतवानी ठेवले आहे. यात कोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदे, पालक, मेथी अशा विविध भाज्यांची लागवड केली आहे. तसेच विविध प्रकारच्या फुलांची बाग या ठिकाणी लावली आहेत.विद्यार्थी नियमित या बागेला पाणी घालतात.बदलत्या काळानुसार ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांंचे फ्याड चालु असताना देखील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेने इंग्रजी माध्यमांच्या शाळापेक्षाही जास्त सुविधा देऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये शाळेतील शिक्षकांना गावातील ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाल्याने या शाळेवर व ग्रामस्थांवर परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.सध्या युग संगणकाचे युग असताना बदलत्या काळानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठया प्रमाणात वाढलेल्या आहेत व साधारणपणे दोन ते तीन वर्षांपूर्वी या इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परीषदेच्या शाळा बंद होतील की असा प्रश्न सर्वांपुढे उभा राहीला होता. परंतु बदलत्या काळानुसार जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये देखील बदल होऊ लागले आहेत व जे इंग्रजी शाळेत शिकवले जाते त्याचप्रमाणे मराठी माध्यमातून शिकवले जात आहे.व अशीच एक जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे या गावातील जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता १ ली ४ पर्यत ची शाळा असुन १९६ पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत शिकत आहे. मागील काही वर्षात ग्रामीण भागात इंग्रजी शाळेंची संख्या वाढत चालल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली होती परंतु या जिल्हा परिषदेच्या शाळेने डिजिटल स्वरूप प्राप्त केल्याने आता जिल्हा परिषदेच्या या शाळेत इंग्रजी माध्यमांची मुलं प्रवेश घेत आहेत. शाळेची मोडकळीस आलेली इमारत बांधण्यासाठी इम्फथी फाऊंडेशने बांधून देते म्हटल्यावर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मिटींग घेऊन पहील्यांदा शाळेच्या कामाला मदत करायची असा निर्णय घेतला व हनुमानमंदिराचे काम पाठिमागे ठेऊन दहा टक्के लोकवर्गणी गोळा केली व सुमारे १ कोटी रुपये खर्च करून शाळेची इमारत बांधून घेतली.पारगाव तर्फे आळे येथे असणाऱ्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना शिक्षणा बरोबर सामाजिक व व्यावहारिक ज्ञानाचे धडे ही दिले जातात.शाळेत विजेच्या बचतीसाठी सौर युनिट, डिजिटल बोर्ड, संगणक कक्ष, फिल्टर पाणी, खेळाचे साहीत्य, प्रशस्त क्रीडांगण अशा अनेक सुविधा या शाळेत आहेत. येथील शिक्षक शाळेत हस्ताक्षर स्पर्धा, भाषण स्पर्धा,पाढे पाठांतर, खेळातून शिक्षण, बाल आनंद मेळावा, विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणुन बाजार भरवला जात आहे. असे विविध उपक्रम शाळा राबवते.या शाळेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफणे व सर्व शिक्षण आपल्या शाळेच्या वेळा व्यतिरिक्त अधिकच वेळ देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे नियमित लक्ष देतात. तसेच पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, गावच्या सरपंच रेश्मा बोरकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, माजी सरपंच देवराम तट्टू , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ तट्टू, उपाध्यक्ष हनुमंत भोर, सचिन डुकरे, पांडुरंग डुकरे यांसह सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य शाळेला लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!