सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये पुणे विद्यापीठ ‘गुणवत्ता सुधार योजने’ अंतर्गत संशोधन कार्यशाळा संपन्न

1 min read

राजुरी दि.७:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘गुणवत्ता सुधार योजने’ (QIP) २०२५-२६ अंतर्गत “Cutting Edge Research and Innovation” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. सुरुवात विद्यापीठ गीताने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर अकॅडमिक डीन प्रा. पी. बालरामुडू यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून संशोधनाचे महत्त्व आणि शैक्षणिक प्रगतीवर मोलाचे मार्गदर्शन केले. विद्या प्रतिष्ठान, बारामती येथील डॉ. चैतन्य कुलकर्णी आणि प्रा. प्रदीप घोरपडे यांनी ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता, पेटंट फाइलिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी सल्लागार समितीतील विभाग प्रमुख डॉ. मनोज कुमार, प्रा. रंधवण भगवत, प्रा. रेड्डी मणिकंठा, प्रा. खताळ कविता, प्रा. राहणे दिव्या प्रा. खेमनार कविता आणि प्रा.उद्धव भारती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक प्रा. नांगरे वैभव, प्रा. नलावडे तेजस आणि सह-समन्वयक प्रा. गाढवे गौरव प्रा. रुपेश कांबळे प्रा. नेहे यश यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक व संशोधकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!