विद्या निकेतनचा ‘माजी विद्यार्थी संमेलन’ 2026’ उत्साहात संपन्न

1 min read

बोटा दि.६:- येथील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर, बोटा येथे दि. 4 रोजी ‘माजी विद्यार्थी संमेलन 2026 हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यास ४० हून अधिक माजी विद्यार्थीमोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दिपक रहाणे (कॅम्पस डायरेक्टर, विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट),प्रा.अभंग सर(प्राचार्य,विद्या निकेतन आयटीआय कॉलेज),प्रा.वाकचौरे (एचओडी, विद्या निकेतन इंजिनिअरिंग कॉलेज) तसेच प्रा. कोल्हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास, प्रामाणिकपणा आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी माजी विद्यार्थ्यांनी संस्थेशी कायम संपर्क ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही केले.यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणकाळातील आठवणींना उजाळा देत सध्याच्या करिअर प्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी, स्पर्धा आणि आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा व दिशा मिळाली.या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. दिपाली कुरकुटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शेवटी उपस्थित सर्व मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे माजी विद्यार्थी व संस्था यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!