शिरोली बोरी विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
1 min read
शिरोली दि.६:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी या विद्यालयातील पाच विद्यार्थी NMMS 2025-26 या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत असे घवघवीत यश मिळाले आहे.
अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश शेळके यांनी दिली आहे.इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी असलेली ही शिष्यवृत्ती परीक्षा सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते.परंतु पुणे जिल्हा शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दर्जेदार सराव चाचण्या, विद्यालयातील शिक्षकांडून झालेले
उत्तम मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम या जोरावर विद्यालयास या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त झाले आहे.इयत्ता आठवीतील स्वरा सहदेव आतकरी या विद्यार्थिनीने विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला असून श्रेया अशोक डावखर, समृद्धी अर्जुन खिलारी,
वैभवी श्रीकांत सोनवणे व आयुष दत्तात्रय जाधव हे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सर्वच स्तरावरून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.या विद्यार्थ्यांना शेळके योगेश, भारती उषा आणि मयूर कसाळ व सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रामभाऊ सातपुते या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
