कांद्याच्या शेतात पाणी देत असताना महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न
1 min read
Oplus_16908288
साकोरी दि.४:- पानसरे मळा साकोरी (तालुका.जुन्नर) येथील आशालता भिकाजी पानसरे (वय ५२) बुधवार (दि.४) सकाळी ७ वाजता घराशेजारी असणाऱ्या कांद्याच्या शेतात पाणी देण्यासाठी चालल्या होत्या. पिकाला पाणी देण्यासाठी त्या खाली वाकल्या होत्या. शेजारच्या मकेच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप टाकून हल्ल्याचा प्रयत्न केला.

पानसरे सावध झाल्याने बिबट्याची झेप चुकली. सुरक्षेसाठी त्या गळ्याला नेहमी स्कॉर्प घालत असतात. आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. सुदैवानं बिबट्याच्या तावडीतून त्या बचावल्या. मंगळवार दि.३ रोजी त्यांच्याच पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. घराच्या आजूबाजूला उसाची शेती असल्याने तसेच ओढायला पाण्याची सोय असल्याने बिबट्यासाठी पोषक वातावरण आहे.

त्यामुळे येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. सदर घटना घडल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असून तत्काळ पिंजरा लावण्या आला असल्याची माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली.


