महात्मा गांधी विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश

1 min read

पारगाव दि.२६:- महात्मा गांधी हायस्कूल स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) यांचे एन .एम. एम. एस. परीक्षेत उत्तुंग यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम .एम. एस.) परीक्षेत श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे संचलित महात्मा गांधी हायस्कूल स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे या विद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले एन.एम.एम.एस. (NMMS)परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा यावर्षीचा हा उच्चांक आहे. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा, संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र बोरा, पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण यांनी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शंकर भोर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, माजी सरपंच देवराम तट्टू, उपसरपंच रामचंद्र डुकरे, चेअरमन नितीन चव्हाण, बळीराम चव्हाण, सचिन डुकरे, शांताराम डुकरे, आप्पा पानसरे उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शाळा सुधारनेत दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.जालिंदर नवले या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस वाटचालीस विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!