शरदचंद्र पवार इंजीनिअरींग कॉलेजमध्ये निर्भयकन्या कार्यशाळेचे आयोजन
1 min read
ओतूर दि.२५:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ओतुर आणि महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डुंबरवाडी ओतूर (ता. जुन्नर) येथे मंगळवार दिनांक २४ रोजी निर्भय कन्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे रवीकुमार भोर (अध्यक्ष पत्रकार संघ, बँड ॲम्बेसिडर चाइल्ड फंड इंडिया व स्पर्श फाउंडेशन पुणे) मा.किरण जायकर (उपाध्यक्ष इसीटीएल पुणे) आरती बनसोडे क्रिडा शिक्षक व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, खामुंडी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी यु खरात,
कार्यक्रमाचे समन्वयक व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिके शन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बानखेले, प्राध्यापक पुजा निघोजकर, महाविद्यालय विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. मोनिका रोकडे, एआयएमएल विभागप्रमुख डॉ. पूजा घोलप तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवीकुमार भोर यांनी महिला उद्योजकता प्रगतीची नवी दिशा या विषयावर आज महिला आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.शिक्षण तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांमुळे अनेक महिला व्यवसायिक क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत.
त्यामुळे आर्थिक स्वावलंबनासोबत रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. योग्य प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास महिला उद्योजकता देशाच्या विकासाला अधिक वेग देऊ शकते त्याचप्रमाणे महिला सबलीकरण, महिला व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच किरण जायकर यांनी सामाजिक शारीरिक व मानसिक आघात तसेच अनुचित शेरेबाजी, अनुचित मागणी,अनुचित विनंती याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आरती बनसोडे यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देऊन
त्याविषयी आत्मसंरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके विद्यार्थिनीसमोर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री चितळे या विद्यार्थिनीने केले.
