भेसळयुक्त दूध सेवनाने किडनी फेल; चार जणांचा मृत्यू

1 min read

गोदावरी दि.२५:- आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंद्री भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या ४८ तासांत किडनीशी संबंधित आजाराने चार जणांचा मृत्यू झाला आहे. इतर बारा जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व बाधित व्यक्तींचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडितांनी भेसळयुक्त दूध सेवन केले होते. भेसळयुक्त दूध सेवन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि चौघांचा मृत्यू झाला. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.तपास अधिकाऱ्यांनी कोरुकोंडा मंडळातील नरसापुरम गावातील एका दूध विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचा बेकायदेशीर डेअरी युनिट देखील जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या विक्रेत्याकडून दूध घेणाऱ्या १०५ कुटुंबांपैकी ७५ कुटुंबांचे नमुने घेण्यात आले आहेत. संशयास्पद आजाराचे कारण निश्चित करण्यासाठी चाचणी सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!