भास्कर गाडगे यांच्या नेतृत्वाखाली तांबे-बारव गटाची बैठक
1 min read
बारव दि.२२:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भास्कर गाडगे यांच्या नेतृत्वाखाली तांबे-बारव गटाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या संघटनात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत भास्कर गाडगे यांनी प्रत्येक गावाचा आढावा घेत शिवसैनिकांच्या समोरील समस्या जाणून घेतल्या.
काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी बाराव-तांबे गटाचे उपतालुका प्रमुख कावा गागरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सनी भोर, युवासेना उपतालुका प्रमुख अभिषेक गवळी, प्रसाद बनकर, वैभव चौगुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
