रॉयल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

1 min read

मोशी दि.२०:- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे युगपुरुष होते. त्यांच्या शौर्याला, नेतृत्वाला आणि लोककल्याणकारी विचारांना एका दिवसात मोजता येणार नाही. शिवरायांनी दिलेले स्वराज्याचे, स्वाभिमानाचे आणि न्यायाचे धडे आजही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून विचार केला, तर आज आपण जे काही आहोत, त्यामागे शिवरायांच्या विचारांचा किती मोठा प्रभाव आहे, हे सहज लक्षात येते. शिवजयंतीचा उत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी त्यांच्या महान कार्याची आठवण करून देणारा दिवस आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सामान्य जनतेमध्ये आत्मसन्मान, धैर्य आणि राष्ट्रप्रेम जागवले. त्यांच्या जीवनात मातोश्री जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, ज्यातून आदर्श नेतृत्व घडले.या पार्श्वभूमीवर रॉयल स्कूलमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये पोवाडे, भाषणे, नाट्यछटा, गीते आणि वेशभूषा सादरी करणाचा समावेश होता.कार्यक्रमादरम्यान मुलांनी शिवरायांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि आदर्श राज्यकारभाराची प्रभावी मांडणी केली.• प्रेरणादायी वातावरण: विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे व भाषणे ऐकून संपूर्ण शाळेत राष्ट्रभक्ती, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.शाळेत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आदर, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते. असे शिक्षकांनी सांगितले.या उत्सवामध्ये संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य स्वाती ढेरंगे उपस्थित होते शिवजयंती निमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शिवरायांचे विचार रुजवणारा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!