सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी; गड-किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा
1 min read
राजुरी दि.१९:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महरिया चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सचिन चव्हाण आणि अकॅडमिक डीन पी.बलरामडू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी शिवशौर्याचा जागर कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांतून शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत केला. सलोनी पवार हिने आपल्या शैलीदार शब्दांत कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले.वैष्णवी देठे हिने शिवरायांच्या जीवनावर प्रबोधनात्मक विचार मांडले,
बच्चे तेजस आणि साक्षी पवार यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले.पायल गवारी हिने शिवरायांच्या महतीवर आधारित सुश्राव्य गीत सादर केले. कॉलेजच्या NSS (राष्ट्रीय सेवा योजना) पथकाने विशेष पथनाट्य सादर करून सामाजिक संदेश देत.
या प्रसंगी अकॅडमिक डीन पी. बलरामडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य आणि शिस्त आजच्या काळात किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. सतीश नेहे,
कविता खेमनार, उद्धव भारती आणि महाविद्यालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादात आणि ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या जयघोषात या सोहळ्याची सांगता झाली.
