जुन्नर पंचायत समितीत “युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 

1 min read

जुन्नर दि.१६:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग ग्रामीण जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन

कक्ष पंचायत समिती जुन्नर व ग्रामीण विकास स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (रूडसेट) तळेगाव दाभाडे यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ सभागृह, पंचायत समिती जुन्नर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत

राज अभियान अंतर्गत “युवक युवतींसाठी “रोजगार मेळावा तथा कौशल्य प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपल्या जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून युवक युवती यांनी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतीक चन्नावार (गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती, जुन्नर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!