सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये विद्यार्थी परिसंवाद स्पर्धा उत्साहात संपन्न; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

1 min read

राजुरी दि.१४:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत, राजुरी येथील महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित दोन दिवसीय ‘विद्यार्थी सहभाग परिसंवाद’ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे परीक्षण GMRT चे अधिकारी हनुमंत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला शैक्षणिक अधिष्ठाता (Academic Dean) पी.बालरामुडू उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शाश्वत विकास, महिला सुरक्षा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि ‘माझ्या करिअरची ब्ल्यू प्रिंट’ अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. नियम आणि सहभाग: पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी ६ जणांच्या गटात या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. पारितोषिक वितरण: विजेत्यांना अनुक्रमे ₹३०००/-, ₹२०००/- आणि ₹१०००/- अशी रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.परीक्षक हनुमंत भंडारी यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले, तर संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या वतीने यशस्वीरीत्या करण्यात आले होते.प्रसंगी प्राध्यापक भागवत, औटी , खटाळ,खेमनर, रहाणे उपस्थित होते, कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी वैभव नांगरे आणि तेजस नलावडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!