कामशेत परिसरात १५ लाख एम.डी. अंमली पदार्थ हस्तगत; तीन आरोपींना ताब्यात

1 min read

कामशेत दि.१४:- नशामुक्त भारत अभियानाची सुरूवात भारत सरकारचे वतीने करणेत आलेली असून युद्धपातळीवर प्राधान्याने कारवाया करून भारत देश नशामुक्त करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले आहेत. दि. ०९/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये अवैध व्यवसायांवर कारवाई करणेच्या अनुषंगाने कामशेत परिसरात गस्त करत असताना कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या देवाण-घेवाण होणार असून खात्रीशीर माहिती काढून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, यांनी पथकाला दिले होते. स्था.गु.शा.चे पथकाने पोनि अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माहिती काढत असताना पो.हवा. तुषार भोईटे नेम. स्था.गु.शा. यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे सलीम शब्बीर शेख रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ जि पुणे व प्रतिक अर्जुन निळकंठ रा. तळेगाव स्टेशन तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि पुणे हे त्यांचे ताब्यात प्रतिबंधीत एम.डी. अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करणेसाठी चिखलसे गावचे हद्दीत कामशेत ते पवना नगर रोडवरील केदानाथ मंदिराचे जवळ अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्या माहितीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले. छापा कारवाईचे सर्व साहीत्य व पंचांसह स्था.गु.शा. व कामशेत पो स्टे चे पथक संयुक्त कारवाई साठी रवाना झाले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी दि. ०९/०२/२०२६ रोजी रात्रौ १८/४५ वा. सुास पथकाने जावून छापा कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी १) सलीम शब्बीर शेख वय ३० वर्षे सध्या रा. सिद्धार्थ नगर लोणावळा, ता. मावळ जि पुणे मुळ रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ जि पुणे व २) प्रतिक अर्जुन निळकंठ वय २६ वर्षे, रा. तळेगाव स्टेशन, बैंक ऑफ महाराष्ट्र समोर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि पुणे मुळ रा. कामशेत ता. मावळ जि पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे ताब्यात १५३ ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत एम.डी. अंमली पदार्थ, इलेक्ट्रीक वजन काटा, स्टीलची प्लेट असा १५,३०,०००/- रू.चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८क, २१क, २९ प्रमाणे पोहवा सागर नंदकुमार नामदास, नेम. स्था.गु.शा. पुणे ग्रा. यांनी फिर्याद नोंदविली आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी करता, गुन्हयामध्ये आरोपी ३) संगम सुभाष डोळस वय ३० वर्षे, सध्या रा. टिळकनगर, म्हाडा कॉलनी, कामगार नगर, कुर्ला चेंबुर मुंबई मुळ रा. राहुल चौक, राजगुरूनगर, ता. खेड जि. पुणे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला देखील तपास पथकाने ताब्यात घेतले आहे.आरोपींना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित केले असता, दि. १३/०२/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे. आरोपी समीर शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण ०५ गुन्हे दाखल असून आरोपी प्रतिक निळकंठ हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर गर्दी मारामारी व आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी संगम डोळस याचे विरोधात देखील यापुर्वी एक गुन्हा दाखल आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, कामशेत पोलीस स्टेशनचे पो.नि. शंकर पाटील,स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोसई अभिजीत सावंत, पोसई हनुमंत पासलकर, कामशेत पोलीस स्टेशनचे सपोनि सतीश पाटील, पोसई बालाजी लोसरवार, पोसई दत्तात्रय शेडगे स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार राहुल पवार, अतुल डेरे, तुषार भोईटे, राजू मोमीण, सागर नामदास, मंगेश थिगळे, गणेश धनवे, भारत मोहोळ, दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, बाळासाहेब खडके, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, कामशेत पोलीस स्टेशनचे अंमलदार गणेश तावरे, आशिष झगडे, कैलास गारगोटे, पवन डोईफोडे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सतिश पाटील, कामशेत पोलीस स्टेशन हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!