अजितदादांची बॉडी प्रमाणापेक्षा अधिक फुगली होती:- आमदार रोहित पवार
1 min read
नवीदिल्ली दि.१२:- शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी एक सादरीकरण करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.यावेळी त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचंही म्हटलं होतं.
त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आज दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांची बॉडी ही प्रमाणापेक्षा अधिक फुगली होती, हा प्रकार अबनॉर्मल आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.
दिल्लीत रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असंही ते म्हणाले.
ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता,
त्यानंतर आता फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटलं की,”डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारलं भाजल्यानंतर शरीर सुजतं का? त्यावर त्यांनी सांगितलं की, हो शरीर सुजते.
अजित दादांची बॉडी असामान्यपणे खूप जास्त सुजलेली होती. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणंही महत्त्वाचं आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं? याचं गूढ वाढतच चाललं असल्याचं चित्र आहे.
