२६ व्या ” ऑल महाराष्ट्र ओपन कराटे ” चॅम्पियनशिपमध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलची घवघवीत कामगिरी.
1 min read
वडगाव कांदळी दि.११:- मुंबई येथे रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या २६ व्या “ऑल महाराष्ट्र ओपन कराटे चॅम्पियनशिप” मध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी, कांदळी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या क्रीडा परंपरेला नवा गौरव प्राप्त करून दिला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध वयोगटांत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्ध सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर सुवर्ण व कास्य पदकांची कमाई केली. ८ वर्षे वयोगट (मुले) मध्ये रुद्र रोहित काकडे याने सुवर्णपदक पटकावले, तर समर्थ अरुण कोकाटे याने कास्यपदक मिळवले.
११ वर्षे वयोगट (मुले) मध्ये स्वयम सुभाष खामकर याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.तर आर्यन प्रवीण कालेकर, अर्जुन सत्यवान काळे आणि श्रेयस अण्णा पवार यांनी कास्यपदकांची कमाई करत उल्लेखनीय कामगिरी केली.१४ वर्षे वयोगट (मुले) मध्ये शौर्य किशोर काकडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकले.
१४ वर्षे वयोगट (मुली) मध्ये तनुषा नागराज शेट्टी हिने सुवर्णपदक पटकावून शाळेचा अभिमान उंचावला, तर आरोही रोहित काकडे हिने कास्यपदक मिळवले.या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांची, सातत्यपूर्ण सरावाची व कराटे प्रशिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षक महेंद्र गुळवे सर यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांनीही सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
