बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेची सत्ता

1 min read

बेल्हे दि.१०:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेच्या स्मिता पंकज कणसे यांचा ४४९७ मतांनी विजयी झाला आहे. तर बेल्हे व राजुरी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. जुन्नर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बेल्हे राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये प्रतिष्ठेची लढाई तयार झाली होती. या लढाईत स्मिता कणसे यांनी बाजी मारली. मतदारांनी नवीन महिला सदस्यांची निवड करण्याचं ठरवल्याचं चित्र या मतदारसंघांमध्ये दिसले. तर राजुरी गणामध्ये शिवसेनेचे शांताराम दाते यांचा ३१८७ मतांनी विजयी झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदीप आहेर यांचा पराभव केला. तर बेल्हे गणामध्ये शिवसेनेचे राजेंद्र पिंगट यांचा १४६१ मतांनी विजयी झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या पांडुरंग साळवे यांचा पराभव केला. स्मिता कणसे यांचे पती पंकज कणसे यांनी दुष्काळी आणे पठारावरती केलेलं टँकरने पाणी वाटप तसेच तरुणांचा वाढता पाठिंबा यामुळे विजय सहज शक्य झाला असावा. निकालाच्या पहिल्या फेरीपासून स्मिता कणसे यांनी आघाडी घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!