बोरी- खोडद गटात राष्ट्रवादीच्या कल्पना काळे यांनी राखला गड

1 min read

बेल्हे दि.९:- जुन्नर तालुक्याच्या बोरी – खोडद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना वैभव काळे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या जयश्री खंडागळे यांचा १६३२ मतांनी पराभव केला. हा नवीन जिल्हा परिषद गट असून गटांमध्ये तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी शोकसभेत गावोगावी जाऊन मतदारांना आवाहन केले होते की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उभे केलेले शेवटचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या. त्याचा परिणाम या गटातील मतदारांवर झाला असल्याची चर्चा आहे. या गटामध्ये तिरंगी लढत झाली. कल्पना काळे, जयश्री खंडागळे (शिवसेना शिंदे गट) व कविता पवार (अपक्ष) उमेदवार या तिघांमध्ये लढत झाली.या गटातील बोरी गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजी चव्हाण यांचा ७६९ मतांनी विजयी झाला. संभाजी चव्हाण यांची जनसामान्यासी जोडली गेलेली नाळ व त्यांचे सामाजिक कार्य, पारगाव ग्रामपंचायत पुढे नेहन्यामध्ये असणारे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) राजकुमार गाडगे यांचा पराभव केला. तर खोडद गणात शिवसेनेच्या (शिंदे गट) माधुरी निलख यांचा १३५९ मतांनी विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रगती बढे यांचा पराभव केला. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सून कविता पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली यामध्ये त्यांना मतदारांनी डावल्याचे दिसून आलं.

प्रतिक्रिया

“बोरी – खोडद जिल्हा परिषदेच्या गटात जि.प.सदस्य पदासाठी माजी आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली मला तिकीट देण्यात आले होते व मी बोरी खुर्द गावच्या सरपंच पदी काम करत असताना नेहमी सर्व सामान्य जनतेला न्याय द्यायचे काम केल्यामुळे या गटातील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले आहे.”

कल्पना काळे – राष्ट्रवादी काँग्रेस

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!