डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलनाची घोषणा

1 min read

आळे दि.३१:- राजेंद्र लक्ष्मण आल्हाट, रा.आळे (तालुका. जुन्नर) यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे नगर यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी केलेल्या जमिनी मागणी प्रस्तावावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. अर्धवटल्याची विटंबना, गावातील शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, शासकीय जमिनीचे दुराव वाटप, अविनाश ललित आल्हाट (मयत) यांच्या खून प्रकरणी अद्याप कायदेशीर कारवाई नाही.या मागण्यांबाबत २००९ पासून आंदोलने, उपोषणे करूनही अद्याप न्याय मिळलेला नसल्याने या कामी संबंधित विभागाकडून केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल व न्याय मिळण्यासाठी दि २६ जानेवारी-२०२६ रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते व परिणामी न्याय न मिळाल्यास १ ऑगस्ट-२०२६ पासून पुन्हा आळे येथील डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक स्थळी बेमुदत महाधरणे आंदोलन करणार असल्याबाबत माहिती उपोषणकर्ते राजेंद्र आल्हाट यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!